Advertisement
प्रा. लक्ष्मण ढोबळेभा, भारतीय जनता पक्ष, प्रांतिक सदस्य, सोलापूर
1992 साली बॉंम्ब स्फोटाची झालेली घटना. त्यावेळेला देशद्रोहाशी आलेला संबंध आणि त्यामधून इडीसारख्या केंद्रीय संथेने केलेली चौकशी, दाऊदच्या कारस्थानाशी असलेलं लिंकोंग विचारात घेऊन हर्बल तंबाखूचे मोटे उद्योगपती, लखनऊचे नवाब मलिक यांना अटक करण्यात आलेली आहे. आणि आज आघाडी मधल्या सगळ्याच पक्षांनी असा कांगावा, असा देखावा सुरु केलेला आहे की ही सूडाची भावना ठेवून केलेली चौकशी आहे. 92 साली जेव्हा नवाब साहेबांनी चूक केली. देशाच्या विरुध्द, देश बांधवांच्या विरूध्द आज ज्या चौकशीचे मुद्दे कोर्टासमोर आलेले आहेत आणि भारतमातेवर नवाब मलिक साहेबांनी उगारलेला हात असो किंवा आमच्या जात बांधवांच्या वानखेडे सारख्या एखाद्या सनदी अधिका-यावर उगारलेला हात असो, याबददल जो चुक करतोय आणि ती चूक देशाच्या तिजोरीला हात घालते. देशाचं अर्थकारण उध्वस्त करण्याचं कारस्थान शेजारचा देश करतोय. अशा कारस्थानाला बळी पडणारा कुठलाही माणूस असेल तो माझा सख्खा भाऊ असला तरी सच्चा देशभक्ताना भारत माता की जय म्हणताना ज्यांनी राष्ट्राच्या प्रगतीवर नांगर फिरवलाय ज्यांनी या देशाला, राष्ट्राचा द्रोह केलाय तो एक नंबरचा शत्रु आहे हे मान्यच करावं लागेल. कारखान्यात गफला केला सोडून दिला, पाठबंधाऱ्यात गफला केला सोडून दिल, राजकारणाची बेरीज करायचीयं एवढा वेळ त्याला माफ करा, करून टाकला, आघाडीच्या तीन पक्षामध्ये राष्ट्रवादीचेच दोन आमदार काढावे लागले घराकडं जावे लागले, त्यांना शिक्षा करावी लागली चार आमदारांना झळ पोहोचली हे अती झालं. शिवसेनेच्या दोन आमदारांना काढावं लागलं. राष्ट्रवादीच्या चार मंत्र्यांना काढावा लागलं. ही माणसं अशी का वागतायंत? बर चाळीस कोटीची जमीन नाथा भाऊंना कोणी घ्यायला लावली ते खऱ्या अर्थाने दोषी आहेत. 92 साली जे लोक लखनऊच्या नवाब मलीकांना भेटले ते यापेक्षा जास्त देशद्रोही आहेत. मलिकांपेक्षाही जास्त देशद्रोही आहेत. कारण त्यावेळेला तू असंच बाग, तू देशावर अशा प्रकारचा हात उगार, अशा प्रकारचा चाटे क्लास लावला होता का? मग चाळीस कोटीची जमिन नाथा भाऊंनी घेतली म्हणून मग इडी मागं लागली तर बाकीचे म्हणायला तयार की इडी सूडाचं राजकारणं करते.
आज तीन पक्षामध्ये कॉंग्रेस आहे. शिवसेना आहे. त्यामध्ये वाझे आमुकच मंत्र्यांला का भेटला. वाझे शंभर कोटोबद्दल बोलताना आमुचक लोकांशी त्यानं संधान का बांधले, आमुकच पुलावरून आमुकाचं प्रेत फेकून देताना त्यानं कुणाची मदत घेतली, हे सगळं पुराव्यानीशी हातात आल्यावर त्याला हाक मारुन जर अटक केली, शंभर कोटीला जबाबदार धरून जर चौकशी केल्यानंतर अटक केली आणि अटक केल्यानंतर सात तासाच्या तीन तासांच्या चौकशी नंतर अजूनही कोथिंबीरीला वास येतोय, अजूनही न्याय देवता या देशातली सबळ आहे. समृध्द आहे, निष्कलंक आहे. अशा परिस्थितीत इडी असो, अगर महाराष्ट्राचं सरकार असो, एखादी गोष्ट चूकीची झाली असं वाटलं की कोर्टात जावं आणि मला त्रास होतो, मला विनाकारण त्रास दिला जातोय त्याच्यामध्ये रिलिफ मिळवावी. त्यामध्ये माझ्यावर अन्याय होतोय म्हणून कोर्टात दाद मागावी, अशा पध्दतीनं एका उत्तम अशाप्रकारच्या हिरव्या पानावर प्रेम करणारा मंत्री हर्बल तंबाखूसारखी एक लहान मुलाला मधाची गुठीद्यावी तसं हिरवं हिरवं पान उपयोगात आणणारा मंत्री सालस, निर्मळ असेल आणि त्यानं सांगितलं की मी चांगुलपणाचा मंत्री आहे मी कुराणामधल्या पाच गोष्टीचं पालन करणारा सैनिक आहे, शिपाई आहे. धर्माचा सेवक आहे. गरीबांच्या कल्याणासाठी काम करतोय आणि तरी माझ्या चांगल्या कामाला हे इडीचे लोक त्रास देतात म्हणून कोर्टात मी दाद मागायला आलोय असं जर नवाब मलीक म्हणाले तर देश त्यांचं स्वागत करेल, देश त्यांचा विचार करेल. देश निष्कलंक चारित्र्याच्या माणसाला जर यापध्दतीने इडी वागवतेय, सूतावरून स्वर्गाला जातेय असं जर जनतेला कळलं तर जनता राज्यकर्त्याला कुठं ठेवायचं हे ठरवू शकते. परंतु आघाडीचे प्रवक्ते म्हणून संजय राऊत साहेब सर्वच पक्षाचं गुत्त घेऊन मलाच कळतं आणि बाकीचे सगळे नालायक आहेत असं जर म्हणत सुटले तर फाटक्या तोंडानं एका खासदारानं यापध्दतीनं बोलणं हे समाजाला शोभत नाही म्हणण्यापेक्षा त्याच्या आईवडीलांच्या संस्कारांना शोभत नाही. एवढीच विनंती मला या निमित्तानं करावीशी वाटते. पारध्यांनी चोरी केली. लगेच आणताय आणि लॉकअपमध्ये टाकताय, कुणी तास आडवी घातली, धडक दिली आणि ड्राइव्हरनं धक्का दिला म्हणून माणूस मेला त्याला लगेच अटक करताय आणि देशावर उगारलेला हात बॉम्ब स्फोटामध्ये मारलेली माणसं, लाखो लोकांना झालेली हानी या सर्व गोष्टीला जर दाऊद
सारख्या हस्ताकाला आणि देशाच्या मारेकऱ्याला मदत करण्याची भूमीका जर माझ्या भाऊबंधाने घेतली असेल तर त्याला जबाबदार धरायचा नाही, हे सूडाच राजकारण आहे. असं कव्हर घालून कोन जर अश्लिल पुस्तक वाचत असंल तर त्यांना देशानं हातच जोडले पाहिजेत, हद्दच झाली. सरहद्द झाली. आणि शेवटी ज्या गांधींनी देश वाचवला तो वाचवलेला देश उध्वस्त करण्यासाठी ज्यांनी दाऊदशी संधान बांधलं, देश वाचवला, ब्रिटीशापासून देश सोडवला. तो देश पुन्हा एकदा पाकिस्तानच्या खाईत. खड्डयात घालण्याची पापं जर नवाब मलिकसारखी हर्बल तंबाखूचे उद्योजक करत असतील तर यांचे पाय धरले पाहिजेत? का यांना अटक करून कोर्टासमोर उभे करून कोर्टाची कोणती भाषा यांना समजते ते समजावून सांगितली पाहिजे. याचा देशवासियांनी याचा मराठी मुलखाच्या ताज्या दमाच्या उच्चशिक्षितांनी देशाला मारणारे खरे मारेकरी कोण? राज्यात खरा जातीयवाद पसरवून जातीचं भाडवल करून जातीचं राजकारण करणारे कोण? तपासले पाहिजेत. निटपणानं अभ्यास केला पाहिजे. 86032 उसाची जात आणि 265 ऊसाची जात, खायला चांगला कोणता? कारखान्यात घालायला चांगला कोणता? वजनाला चांगला कोणता? हे आता शेतकऱ्यांना कळतंव, एफआरपी समजते, दूधातला एसएनएस कळतोय, रिकव्हरी समजतेय, कृपा करून ही नाटकं आता फार काळ देशात चालतील असं मला वाटत नाही. देशातला प्रत्येक सुजाण नागरीक या प्रत्येक गोष्टीकडं डोळ्यात तेल घालून बघतोय, अजित डोवाल सारखा माणूस तर पाकिस्तानची लवलेली पापणीदेखील निट मोजतोय, म्हणून आज मादीसारख्या रखवालदाराच्या भारताकडं नजर वाकडीकरून बघण्याची चीनसारख्या तुकड्याची देखिल हिंमत होत नाही हे भारताचं खरं धाडस आहे. नमस्कार.
आपला नम्र
प्रा. लक्ष्मण ढोबळे
भारतीय जनता पक्ष, प्रांतिक सदस्य, सोलापूर