Advertisement
यंदाच्या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शैक्षणिक जगतासाठी अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत .
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शिक्षणाबाबत केलेल्या घोषणांमध्ये डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नवीन प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी डिजिटल विद्यापीठ निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. वन क्लास वन टीव्ही चॅनल 200 टीव्ही चॅनलपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. पूर्वीपासून असलेल्या सुविधांचा विस्तार करण्याबाबत चर्चा झाली आहे. देशाच्या विविध भागांतील शाळकरी मुलांचे शालेय शिक्षणाची दोन वर्षे साथीच्या रोगामुळे वाया गेली आहेत.
● बजेटमधील शिक्षण क्षेत्राच्या तरतुदी
- DTH प्लॅटफॉर्मवर प्रधानमंत्री ई-विद्या योजनेंतर्गत एक चॅनल एक वर्ग योजना 12 वरून 200 टीव्ही चॅनल योजना वाढवली जाईल.
- इयत्ता पहिली ते बारावीच्या मुलांना त्यांच्या प्रादेशिक भाषेत शिक्षणाची सुविधा दिली जाईल.
- डिजिटल साधनांचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करता यावा यासाठी डिजिटल विद्यापीठाची स्थापना केली जाईल.
- टीव्ही, इंटरनेट, रेडिओ आणि इतर डिजिटल माध्यमांद्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये दर्जेदार अध्यापन साहित्य उपलब्ध करून दिले जाईल, जेणेकरून शिक्षकांना ई-सामग्री मिळू शकेल.
- शहरांमध्ये रोजगाराच्या संधी वाढविण्याचे काम केले जाईल.
- पाच सर्वोच्च शैक्षणिक संस्थांना सेंटर ऑफ एक्सलन्सचा दर्जा दिला जाईल.
- त्यांना 25 हजार कोटींचा विशेष निधी दिला जाणार आहे.
- AICTE या संस्थांसाठी प्राध्यापक आणि प्रशिक्षण कार्यक्रमांवर देखरेख करेल.
- दोन लाख अंगणवाड्या अत्याधुनिक करण्यात येणार आहेत.